Pune Crime News | ज्येष्ठ महिलेच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन शेजारी राहणार्‍याने बँकेतून पैसे काढून, सोने गहाण ठेवून 22 लाखांची केली फसवणूक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | ज्येष्ठ महिलेच्या अडाणीपणाचा तसेच नातू मुकबधीर असल्याचा गैरफायदा शेजारी राहणार्‍याने घेतला. त्यांच्या बँक खात्यातून १५ लाख परस्पर काढले. सोने गहाण ठेवून त्यावर परस्पर ८ लाख रुपयांचे कर्ज काढून २२ लाख रुपयांची फसवणूक करुन वेळोवेळी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत सुभद्रा ज्ञानेश्वर राऊत (वय ६८, रा. हनुमाननगर, पौड रोड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमर संजय शिंदे Amar Sanjay Shinde (वय ३४, रा. हनुमानगर, पौड रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२५ ते ६ ऑगस्ट २०२६ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा नातू दिव्यांग असल्याने त्यांचे आर्थिक व्यवहार असतील तर त्या शेजारी राहणार्‍या अमर शिंदे याला सांगत होत्या. ऑक्टोंबर २०२५ मध्ये त्यांच्या एका फ्लॅटची विक्री झाल्याने  त्याचे त्यांच्या खात्यात १३ लाख ७० हजार रुपये आले होते. त्यांना पैशांची गरज असल्याने त्या आपला नातू नितीन राऊत व अमर शिंदे यांना घेऊन कॉसमॉस बँकेत गेल्या. खात्यातून ३५ हजार रुपये काढले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी बँक स्टेटमेंट काढले असता त्यांना समजले की, अमर शिंदे याने एन ई एफ टी स्लीप वर त्यांची व नातू नितीन राऊत यांची सही घेऊन त्यांच्या खात्यावरुन त्याच्या स्वामी समर्थ दुर्स अ‍ॅन्ड ट्रव्हल्सच्या खात्यावर १३ लाख ३० हजार रुपये टान्सफर करुन घेतले. तसेच आणखी एका एन ई एफ टी स्लीपवर सह्या घेऊन त्याच्या ओळखीच्या हेमलता दिनेश सरकार यांच्या खात्यावर ७० हजार रुपये २५ सप्टेंबर २०२५ रोजी ट्रान्सफर केल्याचे पास बुकची प्रिंट काढल्यावर समजले.

घरात पैशांची गरज असल्याने त्यांचा नातू व नातसून यांनी घरातील १५ तोळे सोने अमर शिंदे याला गहाण ठेवण्यासाठी दिले. त्याने ते मनपुरम गोल्ड लोन शाखा डेक्कन कॉर्नर येथे गहाण ठेवले. त्यांच्याकडून ८ लाख २० हजार रुपये कर्ज घेऊन ते ८ लाख २० हजार नातू, नातसून यांना दिले. त्यानंतर त्याने स्वत:च्या खर्चासाठी १५ तोळे सोने गहाण ठेवलेल्या सोन्यावर अमर शिंदे याने पुन्हा मनपुरम गोल्ड लोन कडून ८ लाख रुपये घेतल. असे त्यांचे एकूण २२ लाख रुपये घेतले. तसेच त्यांना वेळोवेळी जीव मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

You may have missed