Pune PMC News | चांदणी चौक ते भूगाव दरम्यानची वाहतूक सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाचे पुढचे पाउल; उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नदीवरील पूल आणि सर्व्हिस रस्त्याच्या कामासाठी निविदा काढली

Pune PMC News

पुणे : Pune PMC News |  महापालिकेने शहराच्या पश्‍चिम भागातील वाहतूक सुधारणेसाठी चांदणी चौक ते भूगाव रस्त्यावरील उड्डाणपूल, नदीवरील पूल आणि ग्रेड सेपरेटरच्या  सुमारे १६४ रुपयांच्या कामाची निविदा आज प्रसिद्ध केली आहे. रस्त्याच्या कामासाठी ८० टक्के भूसंपादन झाले असून या रस्त्याच्या व उड्डाणपुलांच्या कामामुळे या परिसरातील वाहतूक सुरळित होण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

 चांदणी चौकाच्या पलिकडे भूगाव पर्यंत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती झाली आहे.  नियोजीत निवासी प्रकल्पांची संख्या देखिल मोठी आहे.  चांदणी चौकातून पीएमआरडीएच्या प्रस्तावित रिंग रोड, मुंबई बंगळूर बायपास आणि हिंजवडी आयटी पार्कशी जोडणार्‍या या भागात आताच मोठ याप्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.  या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने चांदणी चौक ते भूगाव दरम्यान २. २ कि.मी.च्या मार्गीकेवर ६० मी. रुंद उड्डाणपूल, रामनदीवर७० मी. लांबीचा उड्डाणपूल, पीव्हीपीआयटी कॉलेज चौकात सुमारे ४३० मी. लांबीचा भुयारी मार्ग तसेच उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

या प्रकल्पासाठी ८० टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. उर्वरीत २० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर या कामासाठीची निविदा काढण्यात आली आहे. २९ ऑगस्टपर्यंत निविदेची मुदत आहे, अशी माहिती प्रकल्प विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

You may have missed