Deshpande Landmark | देशपांडे लँडमार्कचा प्रतिष्ठित ‘लँडमार्क पुरस्कार 2026’ने गौरव

Deshpande Landmark | Deshpande Landmark honoured with prestigious ‘Landmark Award 2026’

प्रीमियम आणि लक्झरी गृहप्रकल्पांतील उत्कृष्ट कामगिरीची दखल; नवज्योतसिंग सिद्धू यांच्या हस्ते योगेश अंबादास देशपांडे यांनी स्वीकारला पुरस्कार

पुणे : Deshpande Landmark | रिअल इस्टेट आणि पुनर्विकास क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या देशपांडे लँडमार्क प्रायव्हेट लिमिटेडला प्रीमियम आणि लक्झरी गृहप्रकल्पांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिष्ठित ‘लँडमार्क पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

पुण्यातील द वेस्टिन येथे आयोजित समारंभात माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांच्या हस्ते देशपांडे लँडमार्क प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक योगेश अंबादास देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ₹१ कोटी ते ₹३ कोटी किंमत श्रेणीतील प्रीमियम आणि लक्झरी गृहप्रकल्पांमध्ये कंपनीने केलेल्या उल्लेखनीय कार्याची या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली.

‘वारसा, नेतृत्व आणि लँडमार्क’ या संकल्पनेवर आधारित हा पुरस्कार सोहळा लोकमत समूहातर्फे बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आणि क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि विकासासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

बांधकाम क्षेत्रातील विश्वासार्ह नाव

देशपांडे लँडमार्क प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २००५ पासून प्रमोटर्स आणि डेव्हलपर्स म्हणून कार्यरत आहे. विश्वासार्हता, पारदर्शक व्यवहार, दर्जेदार बांधकाम, वेळेची बांधिलकी आणि ग्राहककेंद्री कार्यपद्धती यांच्या आधारावर कंपनीने पुण्याच्या रिअल इस्टेट आणि पुनर्विकास क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

पुनर्विकास करताना केवळ जुन्या इमारतींचे रूपांतर न करता, तेथील रहिवाशांच्या भावना, आठवणी आणि परस्पर नातेसंबंधांचा आदर राखत आधुनिक, सुरक्षित आणि सुविधायुक्त घरे निर्माण करण्यावर कंपनीचा विशेष भर आहे.

‘वास्तू तथास्तु’मधून नव्या स्वप्नांना आकार
‘वास्तू तथास्तु’ या संकल्पनेच्या माध्यमातून कंपनी जुन्या वास्तूंना नव्या स्वप्नांची आणि उज्ज्वल भविष्याची जोड देत आहे. आधुनिक युगाला अनुरूप स्मार्ट होम्स, प्रत्येक वयोगटासाठी आवश्यक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि कुटुंबकेंद्री संपूर्ण जीवनशैली ही कंपनीच्या प्रकल्पांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

‘एकत्र कुटुंब, सर्वत्र आनंद’ या विचाराला प्राधान्य देत जुन्या घरांशी जोडलेली नाती आणि आठवणी जपून नवी नाती निर्माण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

कंपनीच्या विकासविषयक दृष्टिकोनामध्ये पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून स्वदेशी विचार, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक समरसता या पाच मूल्यांना विशेष स्थान देण्यात आले आहे. आधुनिक विकासासोबत भारतीय कुटुंबव्यवस्थेची मूल्ये, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी जपण्यावर कंपनीचा भर आहे.

ग्राहकांच्या विश्वासाची सन्माननीय पावती

पुरस्कार स्वीकारल्यानंतर योगेश अंबादास देशपांडे म्हणाले,
“हा पुरस्कार आमच्या पारदर्शक कार्यपद्धतीचा, दर्जेदार बांधकामाचा आणि वेळेच्या बांधिलकीचा सन्मान आहे. आमच्या ग्राहकांनी देशपांडे लँडमार्कवर दाखवलेल्या विश्वासाची ही सन्माननीय पावती आहे. आमच्यासाठी घर म्हणजे केवळ चार भिंतींची वास्तू नसून, ते कुटुंबाच्या सुरक्षिततेचे, आनंदाचे, नातेसंबंधांचे आणि भावी पिढ्यांच्या स्वप्नांचे केंद्र आहे.”

हा सन्मान त्यांनी कंपनीचे ग्राहक, सदनिकाधारक, सहकारी, वास्तुविशारद, अभियंते, कंत्राटदार, व्यावसायिक भागीदार आणि संपूर्ण देशपांडे लँडमार्क परिवाराला समर्पित केला.

‘विश्वासातून नाती… गुणवत्तेतून लँडमार्क!’ या ध्येयवाक्यासह आगामी काळातही पारदर्शक, दर्जेदार आणि कुटुंबकेंद्री प्रीमियम गृहप्रकल्प साकारण्याचा संकल्प असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

You may have missed