Pune Crime Court News | पुणे : आरोपीला न्यायालयाचा मोठा दिलासा; आत्महत्या प्रकरणात अटकपूर्व जामीन
पुणे : Pune Crime Court News | मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे यांनी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे तसेच तथ्ये, व्यावसायिक व्यवहार व आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपांमुळे कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचे होते. न्यायालयाने प्रथमदर्शनी आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचे नमूद करत संबंधित वाद हा व्यावसायिक व आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेला प्रथमदर्शनी दिवाणी स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदविले.
आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धांत मालेगावकर (Adv. Siddhant Malegaonkar) यांनी प्रकरणातील प्रत्येक तथ्य, तपासातील कागदपत्रे, उपलब्ध पुरावे तसेच आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंदर्भातील कायदेशीर तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालयांचे संबंधित निवाडे यांचा सखोल अभ्यास करून अत्यंत मुद्देसूद, अभ्यासपूर्ण व प्रभावी युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला. प्रकरणाच्या गांभीर्याचा आणि आरोपांच्या स्वरूपाचा बारकाईने विचार करून, संबंधित व्यावसायिक व्यवहाराची पार्श्वभूमी व आरोपीची प्रत्यक्ष भूमिका न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. आरोपीकडून आयुष्य संपवण्यास प्रवृत्त करण्याच्या स्वरूपाचे कोणतेही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कृत्य प्रथमदर्शनी सिद्ध होत नसल्याचा ठोस कायदेशीर युक्तिवाद करण्यात आला.
सदर सखोल कायदेशीर मांडणी, उपलब्ध पुरावे व तपास कागदपत्रांचा सर्वंकष विचार करून न्यायालयाने आरोपीची शारीरिक कोठडी तपासासाठी आवश्यक नसल्याचे नमूद करत आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला. गंभीर व कठीण स्वरूपाच्या या प्रकरणात सखोल कायदेशीर अभ्यास, योग्य तथ्यात्मक मांडणी आणि प्रभावी युक्तिवादाच्या आधारे आरोपीस हा महत्त्वपूर्ण दिलासा मिळाला.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे मालेगावकर अँड असोसिएट्स यांच्या वतीने ॲड. सिद्धांत श्रीकांत मालेगावकर यांच्यासह ॲड. प्रमोद धुले, ॲड. शुभंकर मालेगावकर, ॲड. प्रेरणा बाविस्कर, ॲड. आकाश मायने, ॲड. अभिषेक चौधरी, अमोल घवाते, ॲड. ईशम देशपांडे, ॲड. ऊर्जा नेऊरगावकर, ॲड. प्रकाश येडगे, ॲड. कुणाल शिरगिले व सहकाऱ्यांनी काम पाहिले.
