Pune Crime News | सराईत आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीला विश्रामबाग पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून 37 लाखांचे सोन्याचांदीचे दागिने हस्तगत करुन 9 गुन्हे आणले उघडकीस (Video)
पुणे : Pune Crime News | घरफोडी करुन सतत वेगवेगळ्या ठिकाणी राहणार्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीला विश्रामबाग पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ९ गुन्हे उघडकीस आणले आहे. त्यांच्याकडून सोन्याचांदीचे ३७ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत.
शंकरसिंग ऊर्फ कुणालसिंग जितेंद्रसिंग जुनी Shankarsing alias Kunalsing Jitendrasing Juni (वय २७, रा. रामटेकडी, हडपसर), रणबीरसिंग धनसिंग बावरी शिकलीगार Ranbirsing Dhansing Bawri Shikligar (वय २६, रा. एकतानगर, बडोदा, गुजरात), अक्षयसिंग ऊर्फ अक्षय बिरुसिंग जुनी Akshaysing alias Akshay Birusing Juni (वय २२, रा. बिराजदार नगर, हडपसर), सोनुसिंग शाखासिंग शिकलीगर /तीलपिटीया Sonusingh Shakhasingh Sikhligar / Tilpitiya (वय २२, रा. एकतानगर, बडोदा, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या चोरट्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ आणि दत्तवाडी परिसरातील एक असे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
शंकरसिंग जुनी हा आरोपी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, आंबेगाव पोलीस ठाणे, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील ३ गुन्ह्यात गेल्या ६ महिन्यांपासून वाँटेड होता. आरोपी स्वत:ची ओळख लपविण्यासाठी डोक्यात केसांचा टोप, तोंडाला मास्क वापरत असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा तोडून चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास केला जात असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित आरोपी उंड्री पिसोळी येथील परिसरात फिरत आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके व त्यांचे सहकारी यांनी उंड्री पिसोळी परिसर पिंजुन काढला. परंतु आरोपी सराईत असल्याने त्यांची जागा सतत बदलत होते.
पुन्हा बातमीदाराने माहिती दिली की, आरोपी एका गाडीतून उंड्री पिसोळी येथील डोंगराच्या रोडने येत आहे. त्यावरुन पोलिसांनी या गाडीला चारही बाजूने घेराव घालून चौघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी पुणे शहरातील ९ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्या चांदीचे ३७ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे, अमोल भोसले, महेश कदम, शशिकांत दरेकर, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवा गायकवाड, अर्जुन थोरात, सागर मोरे, फिरोज इनामदार, नितीन बाबर यांनी केली आहे.
