Pune Crime News | डिलिव्हरी बॉयचे काम करणार्‍या कामगारांची माहिती न दिल्याने येरवडा पोलिसांनी झेप्टो ऑनलाईन डिलेव्हरी कंपनीच्या तिघा मॅनेजरांवर केला गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | कल्याणीनगर सारख्या उच्चभ्रु वस्तीमध्ये असलेल्या झेप्टो ऑनलाईन डिलेव्हरी कंपनीच्या तिघा मॅनेजरांवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कंपनीकडे १५० हून अधिक कामगार हे डिलिव्हरीचे काम करतात. असे असताना या कामगारांची कोणतीही माहिती येरवडा पोलिसांना कंपनीकडून देण्यात आली नसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Zepto Online Grocery Delivery App)

स्टोअर मॅनेजर आकाश सुग्रीव  नरसिंगे Akash Sugriva Narasinge (वय २३, रा. तुकाई दर्शन, भेकराईनगर, हडपसर), अनिल मगर (वय ३७),  अमोल अशोक मेश्राम Amol Ashok Meshram (वय ३६, रा. बप्पा रेसिडेन्सी, साखरे वस्ती, हिंजवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलीस अंमलदार संगम बाळु रोकडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस पथक पेट्रोलिंग करीत कल्याणीनगरमधील झेप्टो ऑनलाईन डिलेव्हरी कंपनीत आले. कंपनीचे मॅनेजर आकाश नरसिंगे यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनाी कंपनीत दिडशेवर डिलेव्हरी कामगार काम करीत असुन त्यापैकी रायडर असलेल्या कामगारांची माहिती कंपनीचे रायडर सी एल एम अनिल मगर यांच्याकडे आहे. इनडोअर कामगारांची माहिती ही कंपनीचे हेड मॅनेजर अमोल मेश्राम यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कामगारांची सर्वसाधारण माहिती पोलीस ठाण्यात कळविली नसल्याचे आकाश नरसिंगे यांनी कळविले. कंपनीचे कामगारांची सविस्तर माहिती येरवडा पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक असतानाही त्याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती येरवडा पोलीस ठाण्याला न कळविता विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या आदेशाची जाणून बुजून अवज्ञा केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड तपास करीत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले की, कल्याणीनगर सारख्या परिसरात अनेक कंपन्या त्यांच्याकडील कामगारांची माहिती पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असताना देत नसल्याने  या कंपन्यांवर कारवाई सुरु केली आहे.

You may have missed