Pune Pimpri Crime News | अनैतिक प्रेम संबंधातून पत्नीचा गळा आवळून खुन करुन तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या; फरशीवर लिहून ठेवली सुसाईड नोट

Pune Crime News

पिपंरी / पुणे : Pune Pimpri Crime News |  पत्नीचे अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरुणाने पत्नीचा गळा आवळून खुन केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार कुरुळी गावात उघडकीस आला आहे.

प्रियांका महादेव इगवे (वय २९) असे खुन झालेल्या पत्नीचे नाव आहे. महादेव मारुती इगवे (वय ३५, रा. कुरुळी, ता. खेड, मुळ रा. पिसेगाव, ता. केज, जि. बीड) असे गळफास घेतलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत प्रियांकाचे वडिल बंडु आत्माराम धुमाळ (वय ५८, रा. शिवणी, बीड) यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कुरुळी येथील अमित बधाले यांच्या भाड्याच्या खोलीत १२ व १३ ऑगस्ट २०२६ च्या रात्री घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव इगवे व प्रियांका हे दोघे पतीपत्नी नोकरी करत होते. त्यांना १० वर्षाचा मुलगा आहे. प्रियांका हिचे निलेश दिलीप कांबळे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा महादेव इगवे याला संशय होता. त्यावरुन त्यांच्यात यापूर्वी भांडणे झाली आहेत. १२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वाअकरा वाजता ते दोघे व मुलगा हे झोपी गेले. त्यानंतर मध्यरात्री महादेव याने प्रियांका हिचा गळा आवळून खुन केला. त्यानंतर त्याने घरातील फरशीवर प्रियांकाच्या प्रेमसंबंधावरुन तिला मारले असल्याचे लिहले. त्यानंतर त्याने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास १० वर्षाच्या मुलाला जाग आली. तेव्हा वडिलांनी गळफास घेतल्याचे पाहिले. आईला उठविण्याचा प्रयत्न केला. तर ती उठवत नसल्याचे पाहिल्यावर त्याने शेजारच्यांना हे सांगितले. त्यानंतर दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जायभाये व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पोलीस उपनिरीक्षक पिंजारी तपास करीत आहेत.