Pune Crime News | प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार दिल्याने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या; हडपसर पोलिसांनी तरुणाला केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | प्रेमसंबंध ठेवून लग्न करण्याचे वचन दिल्यानंतर तिला आजार असल्याचे समजल्यावर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक छळ करुन लग्नास नकार दिला. त्यामुळे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

अतुल महादेव तांबे Amol Mahadev Tambe (वय २१, रा. केळी मार्केट, मार्केटयार्ड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुजा बाबासाहेब नागरगोजे Puja Babasaheb Nagargoje (वय १९, रा. माळवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तिचे वडिल बाबासाहेब वामन नागरगोजे (वय ५९, रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा नागरगोजे ही सिजन मॉल येथे नोकरी करुन मैत्रिणीसोबत माळवाडी येथील पी जी मध्ये रहात होती. ५ ऑगस्ट रोजी तिच्या मैत्रिणीने पुजाने गळफास घेतला असल्याचे वडिलांना कळविले. वडिलांनी तिच्या मैत्रिणीला विचारल्यावर तिने सांगितले की, पुजा हिचे अतुल तांबे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. पुजा हिचे अतुल तांबे याच्यासोबत प्रेमसंबंध असताना  तो तिला लग्न करणार नाही़ तुला काय करायचे ते कर, असे म्हणत होता. त्यानंतर पुजाने त्याला बरेच वेळा समजावून सांगितले. परंतु, तो ऐकण्याचे मनस्थितीत नव्हता. पुजा हिने त्याला तु लग्न केले नाही तर मी आत्महत्या करुन जिवाचे बरे वाईट करेल, असे त्याला सांगितले होते. तरीही अतुल हा पुजाला वारंवार टाळत होता. तो पुजाच्या चारित्र्यावर देखील संशय घेऊन तिला मानसिक त्रास देत होता. पुजा हिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवून तिला लग्न करतो असे आश्वासन दिले होते. तिच्या पोटात गाठ असल्याचा तिला आजार असल्याचे समजल्यावर तिला लग्नास नकार दिल्याने पुजा हिने आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे तपास करीत आहेत.