Pune Police News | पत्नीला मारहाण करत असताना भांडण सोडविणार्‍या कारचालकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा पोलीस अंमलदार निलंबित

Pune Crime News

पुणे : Pune Police News | देवदर्शनासाठी कुंटुबासमवेत गेले असताना एस टी बस स्थानकावर पोलीस अंमलदार पत्नीला मारहाण करत होता. ही भांडणे सोडविण्यास मध्ये पडलेल्या कारचालकाला पोलीस अंमलदाराने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. कारचालक तब्बल अडीच महिन्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीनंतर करमाळा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन पोलीस अंमलदाराला अटक केली. पोलीस उपायुक्त पी आर पाटील यांनी या पोलीस अंमलदाराला निलंबित केले आहे.

अमित सुरेश जाधव Amit Suresh Jadhav (वय ४२, रा. भवानी पेठ) असे निलंबित केलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. सध्या तो पोलीस मुख्यालयात नेमणूकीला होता.

याबाबत शुभम चंद्रकांत भोसले (वय २७,रा. मंगळवार पेठ) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम भोसले हे चालक म्हणून काम करतात. ३१ मे २०२६ रोजी ते, त्यांचा मित्र प्रथमेश चव्हाण यांची इर्टिका गाडी घेऊन अमित जाधव यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी, आई, बहिण व दोन मुलांसह देवदर्शनासाठी घेऊन गेले होते. काही ठिकाणी फिरुन रात्री साडेनऊ वाजता ते करमाळा एस टी बसस्थानकाजवळ चहा, नाष्टा करण्यासाठी थांबले. सुरेश जाधव हा अचानक चिडला. त्याने त्याची पत्नी सोबत आणि आई, बहिणी सोबत शिवीगाळ करु लागला. पत्नीला मारहाण करु लागला. त्यामुळे शुभम व त्याचा भाचा प्रथमेश त्यांची भांडणे सोडवण्याचा खूप वेळ प्रयत्न करु लागले. परंतु, अमित ऐकत नव्हता. त्यांची भांडणे सोडविताना त्याने शुभम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करु लागला. बाजुला पडलेल्या झाडाच्या काठीने शुभम यांच्या हातावर जोरात मारले. त्यानंतर पायावर, डोक्यात काठी मारल्याने ते खाली पडले. डोक्यात काठी मारल्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध पडले. करमाळा येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना लोणी काळभोर येथे उपचारासाठी दाखल केले.

त्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु केले. तब्बल ४१ दिवस उपचार केल्यानंतर ११ जुलै २०२६ रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज  देण्यात आला. त्यानंतर त्यांची तब्येत बरी होत नसल्याने त्यांना घरच्यांनी कर्वेनगर येथील जीवनधारा न्युरो केअर सेंटरमध्ये अ‍ॅडमिट केले. ते हळु हळु पूर्णत: शुद्धीवर आले. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी त्यांचा जबाब नोंदवुन तो करमाळा पोलीस ठाण्यात पाठविला. करमाळा पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी अमित जाधव याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर २२ ऑगस्ट २०२६ रोजी करमाळा पोलिसांनी अटक केली.

अमित जाधव यांचे वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे, अशोभनीय असल्याने पोलीस उपायुक्त पी आर पाटील यांनी त्याला निलंबित केले आहे.

You may have missed