Pune Crime News | टेरेस फ्लॅटचा करार करुन फ्लॅटची विक्री परस्पर दुसऱ्याला करुन डॉक्टर महिलेची फसवणूक करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  कोंढव्यातील भाग्योदयनगर येथील टेरेस फ्लॅटसाठी करारनामा करुन वेळोवेळी फ्लॅटसाठी पैसे घेऊन दुसर्‍या महिलेला विक्री करुन डॉक्टर महिलेची फसवणूक करणार्‍या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहमंद हसन झारेकरी Mohamand Hasan Zharekari (वय ४९, रा. झमझम हाईटस, नाना पेठ) आणि इब्राहिम हसन झारेकरी Ibrahim Hasan Zharekari (वय ५३, रा. गणेश पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत डॉ. मोहसिना इलियास महेंदी (वय ३८, रा. सुप्रीम तहुरा, भाग्योदयनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील भाग्योदयनगरमधील सुप्रीम तहुरा बिल्डिंगमध्ये जून २०२४ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहमद झारेकरी व इब्राहिम झारेकरी यांनी सुप्रीम तहुरा या बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक ५०२ व त्याचे बदल्यात सुप्रीम तहुरा बिल्डिंगमधील ७ व्या मजल्यावरील फ्लॅट ७०० स्क्वेअर फुट एरिया असलेला टेरेस फ्लॅट विक्रीबाबत फिर्यादीबरोबर लेखी करारनामा केला. फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी १४ लाख ३३ हजार ५०० रुपये घेतले. हा फ्लॅट त्यांना न विकता परस्पर दुसरी महिला जखिया शेख व नावेद रज्जाक शेख यांना विक्री केला. त्यांच्याकडून घेतलेल्या रक्कमेपैकी केवळ ५ लाख ५० हजार रुपये परत करुन उरलेले ८ लाख ८३ हजार ५०० रुपये परत न करता फिर्यादी यांची दिशाभूल करुन फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत.

You may have missed