Pune Crime News | कोंढवा : फ्लॅट विक्री करार करुन तो परस्पर दुसर्याला विकून 14 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | इमारतीतील शेजारचा फ्लॅट विकायचा असल्याचे समजल्यावर त्यांनी घरमालकाशी संपर्क साधला. २२ लाख रुपयांचा करार करुन त्यांनी १४ लाख रुपये दिले. ८ लाख भाडेकरुला द्यायचे होते. भाडेकरुने एक महिना थांबायला सांगितले. दरम्यान, जागा मालकाने परस्पर दुसर्याला फ्लॅट विक्री करुन १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आदिल नजीर सय्यद Adil Nazir Sayyad (वय ३५, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), जाफर थमीउल्ला खान Jafar Thamiullah Khan (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), सामी मुस्ताक खान Sami Mustaq Khan (वय ४५, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत हनिफ अब्दुल कादर शेख (रा. के के टॉवर, मिठानगर, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील के के टॉवर येथे मे २०२५ पासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राहत असलेल्या बिल्डिंगच्या बाजुचा के के टॉवरमधील फ्लॅट विक्रीसाठी निघाला आहे, हे त्यांना मित्राकडून समजले. त्यांनी हा फ्लॅट खरेदी करण्याची तयारी दाखविली. त्यांचा मित्र शाहरुख शेख याने आदिल सय्यद यांची भेट घालून दिली. अदिल सय्यद यांनी सांगितले की त्याचे नावाचा फ्लॅट असून तो त्यांना सामी खान यांच्याकडून येणे बाकी असलेल्या २४ लाख रक्कमेमध्ये विकत घेतला आहे. त्यांनी हा व्यवहार २२ लाख रुपयांमध्ये ठरवला. त्यांनी सामी खान यांना हा फ्लॅट विकत घेत असल्याचे कळविले. तेव्हा त्यांनी त्यांची कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. त्यावेळी सामी खान यांनी पहिला भाडेकरु सोहेल इकबाल शेख हे राहत होते. त्यांना ८ लाख रुपये देणार आहे. व उर्वरीत १४ लाख रुपये फिर्यादी यांनी आदिल सय्यद व जाफर खान यांना द्यावयाचे ठरले होते. त्यानंतर २१ जानेवारी २०२५ रोजी आादिल सय्यद व जाफर खान यांना त्यांनी १४ लाख रुपये दिले.
त्याच दिवशी कुलमुखत्यारपत्र बनविले. के के टॉवरमधील फ्लॅट खरेदीचा लेखी करारनामा केला. त्यांनी के के टॉवरमधील फ्लॅटमध्ये राहणारे सोहेल शेख यांना करारनाम्याप्रमाणे त्याचे ८ लाख रुपये देऊ केले असता त्यांनी दुसरा फ्लॅट पाहण्यास एक महिना वेळ लागेल, असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी वेळ दिला. एक महिन्यानंतर सोहेल शेख यांचे राहिलेले ८ लाख रुपये घेऊन त्यांना घराचा ताबा देण्यास विनंती केली. त्यांनी ८ लाख रुपये घेतले नाही आणि घराचा ताबा दिला नाही. मे २०२५ मध्ये फ्लॅटचे मुळ मालक सामी खान याने फिर्यादी यांची दिशाभूल करुन सोहल शेख यांना त्यांच्याकडून घेतलेले ८ लाख रुपये परत करुन फ्लॅटचा ताबा स्वत:कडे घेतला. हे समजल्यावर फिर्यादी यांनी माझे १४ लाख रुपये परत करा, अशी विनंती केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन फ्लॅटचा ताबा दिला नाही. शेवटी त्यांनी आता फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करीत आहेत.
