Pune Crime News | रक्षाबंधनाला भाऊ निघाला, बहिणीच्या घरी पोहचण्यापूर्वी तिची बातमी आली अगोदर, सासरच्या छळाला कंटाळून बहिणीची आत्महत्या

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  कामानिमित्त मुंबईला गेल्याने रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जाऊ शकला नव्हता. त्यामुळे दुसर्‍या दिवशी तो बहिणीच्या घरी पोहचण्यापूर्वीच बहिणीची दु:खद बातमी त्याच्या कानावर पडली, बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची. राखी बांधून घेण्यासाठी हात पुढे करण्याऐवजी त्याला तिच्या सासरच्याविरोधात फिर्याद देण्याची वेळ आली.

मनिषा सचिन मेमाणे (वय २०, रा. फळोदे, तळेघर, ता. आंबेगाव) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. तिचा भाऊ प्रदिप रखामा जोशी (वय २६, रा. मातोश्री, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती सचिन मारुती मेमाणे (Sachin Maruti Memane) व जाऊ रंजना दत्तु मेमाणे (रा़ फळोदे, तळेघर, ता़ आंबेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद प्रदिप जोशी यांची बहिण मनिषा हिचा मार्च २०२२ मध्ये सचिन मेमाणे याच्याबरोबर विवाह झाला. त्यांना एक २ वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर तीन चार महिन्यांने बहिणीची जाऊ रंजना दत्तु मेमाणे ही बहिणीसोबत घरातील प्रॉपर्टीवरुन तिच्याशी वाद घालून तू घरात राहायचे नाही, असे नेहमी बोलत असे. कौटुंबिक वादामुळे सचिन मेमाणे हे मनिषाला घेऊन चाकण येथे राहून खासगी कंपनीत नोकरी करीत होते. दरम्यानच्या काळात सचिन मेमाणे हे ही मनिषाला तुला गावी राहयचे नसेल तर तुझ्या बापाच्या घरी जा.

मला तुझ्यासोबत राहायचे नाही, असे वारंवार बोलत असत. फिर्यादी यांनी त्यांच्या दाजींना समजावुन सांगितले. त्यानंतर ६ महिन्यांपूर्वी ते खेड तालुक्यातील चांडोली येथे राहण्याकरीता आले. मनिषा हिची सासु भोराबाई मेमाणे यांना दोन आठवड्यापूर्वी अर्धांगवायुचा झटका आल्याने त्यांना लांडेवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. प्रदिप यांचे वडिल पहायला हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेथे मनिषा हिने मला दवाखान्यातच थांबवुन तिला राबवुन घेत असल्याचे सांगितले होते. सर्व कामांकरीता एकटीलाच राबवुन घेत असल्याचे तिने वडिलांना सांगितले. सासुला आठवड्यापूर्वी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या सेवेकरीता मनिषा हिला जाणून बाजून सचिन याने गावी ठेवले होते. त्या ठिकाणी पती सचिन व जाऊ रंजना मेमाणे हे तिचा शारीरीक व मानसिक त्रास देऊन क्रुर वागणूक देऊन तिचा छळ करीत होते.

फिर्यादी प्रदिप जोशी हे कामानिमित्त २७ ऑगस्ट रोजी  मुंबईला  गेले असल्याने त्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी मनिषाकडे जाता आले नव्हते. त्यामुळे दुसर्‍या दिवशी २९ ऑगस्ट रोजी ते दुपारी खेड येथे बहिणीला भेटण्याकरीता गेले. त्यावेळी त्यांची दुसरी बहिण सविता हिने फोन करुन सांगितले की, मनिषा हिने चांदोली येथील राहत्या घरी गळफास घेतल्याचे सांगितले. रक्षाबंधनासाठी जात असलेल्या प्रदिप जोशी यांना बहिणीचा मृतदेह घेऊन हॉस्पिटलमध्ये जावे लागले. गळफास घेण्यापूर्वी मनिषा हिने सुसाईड नोट लिहिली होती. त्यात तिने घरच्या त्रासाला व जाऊबाईची सतत कटकट व नवरा ऐकत नसल्याचे लिहिले आहे. पोलीस उपनिरीक्षक अभिजित कुदळे तपास करीत आहेत.

You may have missed