Pune Crime News | मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या चौघांना पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला साडेचार लाखांचा माल
पुणे : Pune Crime News | मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या चौघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने नाना पेठ परिसरात पकडले. त्यामध्ये एक अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ७१ ग्रॅम मेफेड्रोन, दुचाकी, मोबाईल असा ४ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
नासीर रसूल शेख Nasir Rasul Shaikh (वय २२, रा. मोहम्मदवाडी, सय्यदनगर, हडपसर), फराज नजीर शेख Faraz Nazir Shaikh (वय २४, रा. सय्यदनगर, हडपसर), जावेद हसन शेख Javed Hasan Shaikh (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आरोपींबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक शनिवारी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, नाना पेठेतील एडी कॅम्प चौकात सात जण मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहेत. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चौघांना पकडले. त्यांच्याकडून ७१ ग्रॅम मेफेड्रोन, तीन दुचाकी, मोबाइल असा माल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त हसन गौहर, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर, सहायक फौजदार विठ्ठल साळुंके, आशा भिंगारे, पोलीस अंमलदार अमोल सरडे, अक्षय शिर्के, क्षीरसागर, साळुंखे, राजे, गुंड यांनी केली.
