Health Department News |  पुणे : बालआरोग्य आणि कुटुंब नियोजनाच्या कामात हलगर्जीपणा भोवला! आरोग्य विभागाच्या दोन सहायक संचालकांवर निलंबनाची कारवाई

Health Department News | Pune: Negligence in child health and family planning initiatives proves costly; two Assistant Directors of the Health Department placed under suspension.

पुणे : Health Department News |  राज्य सरकारच्या बालआरोग्य आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत त्रुटी आढळल्याने आरोग्य विभागाने पुण्यातील दोन सहायक संचालकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. क्षेत्रभेटी न देणे, कामकाजावर योग्य देखरेख न ठेवणे आणि आवश्यक अहवाल सादर न करणे, या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली.

डॉ. राजकुमार जगताप (Dr. Rajkumar Jagtap) आणि डॉ. राजश्री ढवळे (Dr. Rajashree Dhawale) अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. डॉ. जगताप यांच्याकडे बालआरोग्य कार्यक्रमाची, तर डॉ. ढवळे यांच्याकडे कुटुंब नियोजन कार्यक्रमाची जबाबदारी होती.

आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी १२ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत दोन्ही अधिकाऱ्यांचे काम असमाधानकारक असल्याचे आढळले. त्यानंतर चौकशी करून १३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले.

निलंबनाच्या काळात दोन्ही अधिकाऱ्यांचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात निश्चित करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध पुढील विभागीय चौकशीही होणार असून, पुढील आदेशापर्यंत निलंबन कायम राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

या कारवाईमुळे आरोग्य विभागात चर्चांना उधाण आले आहे.

You may have missed