Ambedkar Jayanti | पुणे : कोंढव्यात प्रथमच भव्य बाबासाहेबांचा 25 फुटी पूर्णाकृती पुतळा उभारून अत्यंत दिमाखात 135 वी जयंती साजरी – आयोजक ॲड. तोसिफ शेख (Video)
पुणे : Ambedkar Jayanti | कोंढवा खुर्द येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त प्रथमच २५ फूट उंचीचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारून जयंती उत्सव अत्यंत दिमाखात साजरा करण्यात येत आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, कोंढवा खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक १३/०४/२०२६ रोजी रात्री ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समता सैनिक दल व भीम सैनिकांकडून मानवंदना, सामूहिक बुद्ध वंदना तसेच फायर शोचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच मंगळवार दिनांक १४/०४/२०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन व मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून भव्य लाईट शो, भव्य पुतळा, फायर शो तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण नरवीर तानाजी मालुसरे चौक, ज्योती हॉटेल जवळ, कोंढवा खुर्द येथे असून परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आयोजन ॲड. तोसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, ॲड. हाजी गफूरभाई पठाण (नगरसेवक, पुणे मनपा) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
समस्त कोंढवा खुर्द ग्रामस्थ, मुस्लिम समाज तसेच बहुजन समाज यांच्या विशेष सहभागातून हा जयंती उत्सव सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार आहे.
