Pune Crime News | स्कॉर्पिओ कारमधून विदेशी दारुची वाहतूक करणार्‍यास लक्ष्मीनगर पोलिसांनी पकडून 2 लाखांच्या दारुसह 23 लाखांचा माल केला जप्त

Pune Crime News | Laxmi Nagar police arrested a man transporting foreign liquor in a Scorpio car and seized liquor worth Rs 2 lakhs and goods worth Rs 23 lakhs

पुणे : Pune Crime News |  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अवैध व्यवसायावर कारवाई करीत असताना स्कॉर्पिओ कारमधून विदेशी दारुची वाहतूक करणार्‍यास लक्ष्मीनगर पोलिसांनी पकडले. त्याच्या गाडीतून २ लाखांच्या विदेशी दारूसह २३ लाख ३० हजार ९७५ रुपयांचा माल जप्त केला आहे.

अंग्रेजसिंग पुरणसिंग गिल Angrezsingh Puransingh Gill (वय ३८, रा. रामनगर, बोपखेल) असे या तस्कराचे नाव आहे.

लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक शहादवाल बाबा चौक येथे १४ एप्रिल रोजी पहाटे बंदोबस्ताचे काम करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार भिमराव कांबळे व अमोल वायाळ यांना बातमदारामार्फत माहिती मिळाली की, एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी अहिल्यानगर रोडच्या दिशेने विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करीत आहे. ही बातमी मिळताच पोलीस पथकाने  शहादल बाबा चौकातील केंद्रिय महाविद्यालयाजवळ सापळा रचला. तेथे आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीला थांबविले. चालक अंग्रेजसिंग गिल याने  गाडीची डिकी उघडल्यावर आतमध्ये विविध ब्रँडची २ लाख रुपयांची विदेशी दारू मिळून आली. स्कॉर्पिओ, मोबाईल व विदेशी दारु असा एकूण २३ लाख ३० हजार ९७५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस निरीक्षक  (गुन्हे) उमेश गित्ते, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत, रविकांत नंदनवार, पोलीस अंमलदार भिमराव कांबळे, अमोल वायाळ,  दत्तात्रय शिदे, सुरज ओंबासे, अमोल गायकवाड, कादिर शेख, राहुल परदेशी, अतुल जाधव, उगले यांनी केली आहे.