Dehu Road Pune Crime News | पुणे : पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड परिसरात धक्कादायक घटना; भाजप कार्यकर्त्याला गोळ्या झाडून संपवलं; 16 राउंड केले फायर

Dehu Road Pune Crime News | Pune: Shocking incident in Dehu Road area of ​​Pimpri-Chinchwad; BJP worker shot dead; 16 rounds fired

देहूरोड: Dehu Road Pune Crime News | पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या थरारक घटनेत भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सवाना चौकात उभ्या असलेल्या रमेश रेड्डीवर हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. तब्बल १६ राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यातील एक गोळी त्यांच्या डोक्यात लागली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर देहूरोड परिसरात एकच खळबळ उडाली. मोठ्या संख्येने नातेवाईक व स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले. संभाव्य तणाव लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, रमेश रेड्डी यांचा काही वादग्रस्त व्यवहारांशी संबंध असल्याची माहिती पुढे येत आहे. या हत्येचा संबंध गेल्या वर्षी झालेल्या त्यांच्या भावाच्या हत्येशी असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांचा वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता.

त्या प्रकरणातील आरोपी अद्याप कोठडीत असून त्यांना जामीन मिळालेला नाही. मात्र त्या घटनेतील तडजोडीवरून काही मतभेद निर्माण झाले होते का, याचाही तपास सुरू आहे. पोलिस सूत्रांच्या मते, याच पार्श्वभूमीवरून ही हत्या घडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणातील अधिक धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

You may have missed