Ashok Milapchand Jain | पुणे : हॉटेलच्या खोलीत उद्योजक अशोक मिलापचंद जैन यांचा मृतदेह आढळला; स्वतः जीवन संपवल्याचा संशय

Ashok Milapchand Jain | Pune: Businessman Ashok Milapchand Jain's body found in hotel room; Suspected of committing suicide

पुणे : Ashok Milapchand Jain | सॅलिसबरी पार्क परिसरातील उद्योजक अशोक मिलापचंद जैन (वय ६१) यांचा मृतदेह आपटे रस्त्यावरील एका हॉटेलच्या खोलीत शनिवारी दुपारी आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, जैन यांनी स्वतः जीवन संपवले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अशोक जैन हे घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेट पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.

दरम्यान, शनिवारी दुपारी हॉटेलमधील एका खोलीचा दरवाजा ग्राहक उघडत नसल्याची माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांनी डेक्कन पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत खोली उघडली. यावेळी अशोक जैन मृतावस्थेत आढळले.

डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले की, मृत व्यक्तीने विषप्राशन केल्याचा संशय आहे. खोलीतील विविध ठिकाणी उलटी झाल्याचे आढळून आले असून, प्रथमदर्शनी हा स्वतः जीवन संपवल्याचा प्रकार असल्याचे दिसून येत आहे.

घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली असून, ती अशोक जैन यांनीच लिहिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

You may have missed