Pune PMC News | पुणे महापालिकेतील 106 अभियंत्यांच्या बदल्या; 172 सफाई सेवकांना मुकादमपदी पदोन्नती

Pune PMC News

पुणे : Pune PMC News | पुणे महापालिकेच्या विविध विभागांत तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या १०६ अभियंत्यांच्या अन्य विभागांत बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच घनकचरा विभागातील १७२ सफाई सेवकांना मुकादम पदावर पदोन्नती देण्यात आली. ही प्रक्रिया सोमवारी पार पडली.

बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांची प्रशासनाने बैठक घेतली होती. या बैठकीत अभियंत्यांच्या पसंतीनुसार बदलीसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. संबंधित अभियंत्यांनी पूर्वी ज्या विभागात सेवा केली आहे, ते विभाग वगळून उर्वरित विभागांसाठी त्यांच्याकडून प्राधान्यक्रम मागविण्यात आले होते.

त्या प्राधान्यक्रमाच्या आधारे बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली.

You may have missed