Basav Seva Pratishthan | बसव सेवा प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आणि गुरू महंत महास्वामींचे प्रवचन

Basav Seva Pratishthan | Basav Seva Pratishthan organizes a grand blood donation camp and delivers a sermon by Guru Mahant Mahaswami

पुणे : Basav Seva Pratishthan |  लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवण्णा यांच्या जयंती निमित्त पुण्यातील बसव सेवा प्रतिष्ठान तर्फे  24 मे रविवारी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत धायरी फाटा येथील त्रिमूर्ती चौकातील सुहासिनी मंगल कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून मानव धर्माचे पालन करावे असे आवाहन बसव सेवा प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी बसव जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. तसेच संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येतात. यावर्षी 24 मे रोजी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करू इच्छिणाऱ्यांनी पूर्व नोंदणी करावी. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

गुरू महंत महास्वामींचे प्रवचन

24 मे रोजी सायंकाळी 5  वाजता बसव पूजन, लिंगायत ध्वज पूजन, वचन नृत्य, वचन गायन संपन्न होईल. तसेच कर्नाटकातील इलकल येथील चित्तरगी विजय महंतेश्वर संस्थान मठाचे श्री.म.नि.प्र. डॉ. गुरू महंत महास्वामीजी यांचे शरण संस्कृती व वचन साहित्य संजीवनी या विषयावर प्रवचन होणार आहे. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमासाठी देखील सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहन प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

रक्तदान नोंदणी, कार्यक्रम तसेच दासोहसाठी खालील नंबर वर संपर्क करावा ही विनंती. 9822578527

You may have missed