Blood Donation Camp In Pune | पुण्यातील रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर ONP Hospitals तर्फे 7 जूनला रक्तदान शिबिर
पुणे : Blood Donation Camp In Pune | शहरासह राज्यातील अनेक भागांमध्ये रक्तसाठ्यात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर ONP Hospitals तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, ७ जून २०२६ रोजी ONP Prime Hospital, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे.
अलीकडील काळात रक्तसाठ्यात घट झाल्याच्या बातम्या समोर येत असून, त्याचा परिणाम आपत्कालीन उपचार, अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, थॅलेसेमिया रुग्ण आणि इतर गंभीर आजारांवरील उपचारांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती करणे आणि स्वयंप्रेरणेने रक्तदानासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
याबाबत ONP Hospitals च्या मेडिकल डायरेक्टर डॉ. अमिता फडणीस म्हणाल्या, “रक्ताला कोणताही पर्याय नाही. रक्तदान हे समाजाप्रती असलेले महत्त्वाचे कर्तव्य आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे आहे. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. पुण्यातील सध्याची रक्तटंचाई लक्षात घेता नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.”
हे रक्तदान शिबिर अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होणार असून रक्तदात्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रक्तदात्यांना प्रमाणपत्र, आरोग्य तपासणी, अल्पोपहार आणि विशेष भेटवस्तू देण्यात येणार आहे.
ONP Hospitals तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थी, कॉर्पोरेट कर्मचारी, गृहनिर्माण संस्था, सामाजिक संघटना आणि सर्व नागरिकांना या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची माहिती
दिनांक : रविवार, ७ जून २०२६
वेळ : सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.००
स्थळ : ONP Prime Hospital, Near Hotel Pride, Shivajinagar, Pune – 05
गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ ONP Hospitals हे विश्वासार्ह, दर्जेदार आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा देणारे अग्रगण्य आरोग्यसंस्थान म्हणून कार्यरत आहे. महिला व बालआरोग्य, मल्टिस्पेशालिटी उपचार आणि विविध सामाजिक आरोग्य उपक्रमांद्वारे संस्थेने समाजसेवेत सातत्याने योगदान दिले आहे.
