Pune Crime News | विषारी दारूसाठी रसायन पुरवणाऱ्या पिता पुत्राला मुंबईतून अटक, सीआयडीची कारवाई

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  फुगेवाडी आणि हडपसर परिसरात विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्या प्रकरणात सी आय डी ने मोठी कारवाई केली आहे. या दारूसाठी रसायन पुरवणाऱ्या दोघा पिता पुत्राला मुंबईतून अटक केली आहे.

अरुण जगदंब चौबे Arun Jagdamba Chaubey (वय ५९) आणि अभिषेक अरुण चौबे Abhishek Arun Chaubey (वय ३४, दोघे रा. वाशीगाव, नवी मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. या आरोपींना पिंपरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

विषारी दारू प्रकरणात विविध घटनास्थळावरून सी सी टीव्ही फुटेज, सँपल, इतर पुरावे जप्त करून ते न्याय वैदयानिक प्रयोगशाळा येथे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.

विषारी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिकंदर राठोड उर्फ योगेश व्हानखेडे याच्याकडून मिथेनॉल मिश्रित हातभट्टीची दारू घेऊन वडारवाडी परिसरात विकणाऱ्या आरोपी आर्यन संजीव धोत्रे यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे.

या गुन्ह्याबाबत कोणाला काही माहिती द्यायची असेल तर सी आय डी चे पोलिस उपअधीक्षक शामराव काळे ( 8237229208) आणि सचिन चव्हाण ( 9011334580) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केले आहे.

You may have missed