Daund Pune Crime News | पुणे : बेकायदेशीर लिंगनिदान आणि स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराची मदतनीस ‘सदिच्छा’ हिला अटक

Daund-Pune Crime News | Pune: 'Sadichha', an accomplice of the mastermind behind an illegal sex-determination and female foeticide racket, arrested.

पुणे / दौंड : Daund Pune Crime News |  बेकायदेशीर लिंगनिदान आणि स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटचा पर्दाफाश करत पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. या रॅकेटमधील मुख्य आरोपी डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड (Dr Sangita Pandurang Gaikwad) हिची मदतनीस सदिच्छा दिलीप शिंदे (Sadichha Dilip Shinde) ऊर्फ सदिच्छा लक्ष्मण भोसले Sadichha Laxman Bhosale (वय २३) हिला अटक करण्यात आली आहे.

पोलिस तपासात सदिच्छाच्या बँक खात्यात लिंगनिदानासाठी घेतलेले पैसे जमा होत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदिच्छा शिंदे ही मुख्य आरोपी डॉ. संगीता गायकवाड हिच्यासोबत काम करत होती.

शिंदवणी येथील फार्महाउस आणि सीताई हाकेनगर परिसरातील फ्लॅटमध्ये गरोदर महिलांना आणून पोर्टेबल सोनोग्राफी मशिनच्या माध्यमातून बेकायदेशीर लिंगनिदान केले जात होते. गर्भातील अर्भक मुलगी असल्याचे समजल्यानंतर संबंधित महिलांना केडगाव येथील ‘पार्थ हॉस्पिटल’मध्ये बेकायदा गर्भपातासाठी पाठवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

विशेष म्हणजे, गर्भपाताच्या प्रक्रियेदरम्यान सदिच्छा शिंदे स्वतः उपस्थित राहत असल्याची माहितीही तपासातून पुढे आली आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ९१, ३(५), ८८ तसेच पीसीपीएनडीटी कायद्यातील कलम ६(ब), ६(क), १८, २३, २५ आणि वैद्यकीय गर्भपात (एमटीपी) कायद्यातील कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

You may have missed