Summons To Allu Arjun | ‘पुष्पा 2’ प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला 22 जूनला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे समन्स
हैदराबाद : Summons To Allu Arjun | ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियर शोदरम्यान संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी न्यायालयीन कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणात शहरातील न्यायालयाने प्रसिद्ध तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनसह इतर आरोपींना २२ जून रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत.
या घटनेच्या संदर्भात हैदराबाद पोलिसांनी यापूर्वी २३ जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. ‘पुष्पा २’च्या प्रदर्शनावेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली होती, ज्यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
