Pune Crime News | सुनेच्या छळ केल्याप्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तासह 7 जणांवर गुन्हा दाखल; सासर्‍यांनी शारीरीक सुखाची मागणी केल्याचा आरोप

Pune Crime News | Case registered against 7 people, including a retired Assistant Commissioner of Police, for harassing daughter-in-law; father-in-law accused of demanding sexual favors.

पुणे : Pune Crime News |  निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने आपल्या सुनेचा मानसिक आणि शारीरीक छळ करुन शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच पती, सासु आणि नणंदांकडून मारहाण करुन छळ केल्याप्रकरणी निवृत्त एसीपीसह ७ जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती विक्रांत सुरेश घाडगे (Vikrant Suresh Ghadge), सासरे सुरेश रामचंद्र घाडगे (Suresh Ramchandra Ghadge), सासु सुनंदा सुरेश घाडगे Sunanda Suresh Ghadge (सर्व रा. डीएसके गार्डन इन्क्लेव, वेलकम हॉलजवळ, पारगेनगर, कोंढवा), नणंद स्नेहल प्रवीण सर्जेराव (Snehal Pravin Sarjerao), नंदवा प्रविण सर्जेराव Nandva Pravin Sarjerao (रा. अकोला) नणंद वैशाली विक्रम राऊत (Vaishali Vikram Raut), नंदावा विक्रम राऊत (रा. अंधेरी, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ३० वर्षाच्या विवाहितेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १७ एप्रिल २०२२ ते ८ मे २०२६ दरम्यान होत होता.

निवृत्त एसीपी असलेले सासरे सुरेश घाडगे हे वांरवार धमक्या देत असत. मी एसीपी होतो, मी आयुष्यभर क्रिमिनल बघितलेले आहेत. पुरावे कसे तयार करायचे आणि नष्ट करायचे हे मला चांगले माहिती आहे. माझ्याकडे इतका पैसा कमविलेला आहे. उद्या कायदा विकत घ्यायची आमची तयारी आहे. मी कोट्यवधी पैसा चाकणला असताना कमविला आहे. मला पैसा ठेवायला जागा नसायची़ तर मी तो कोट्यवधी रुपये बादलीत भरुन ठेवायचे. हा पैसो माझ्या मुली संभाळत असतात. त्यामुळे आम्ही काहीही विकत घेऊ शकतो, माझ्याकडे बंदूक आहे, तुला इथेच मारुन गाडून टाकेन, अशा धमक्या देत होते. तसेच विरोध केल्यास कोयत्याने कापूर टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातून उपसचिव पदावरुन निवृत्त झाले आहे. त्यांच्या मित्रामार्फत विक्रांत घाडगे यांचे स्थळ आले होते. विमाननगर येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी विक्रांत याने दीड लाख रुपयांची अंगठी घ्यायला लावली होती. एप्रिल २०२२ मध्ये सासवड येथे त्यांचा विवाह झाला. या दोन्ही समारंभाचा ५० लाख रुपयांचा खर्च फिर्यादी यांच्या वडिलांना करायला लावला.

विवाहानंतर सासुने सर्व दागिने स्वत:कडे ठेवून घेतले. विक्रांत हा बाहेर जाताना पत्नीला घरात कोंडून ठेवत होता. तिला नोकरी करण्यास मज्जाव करण्यात आाला. तसेच सोशल मीडिया खातीही बंद करण्यास भाग पाडले. माहेरचे आईवडिल घरी आल्यावर त्यांचा अपमान करण्यात येत होता.

विक्रांत याचे बाहेर अनैतिक संबंध होते. विक्रांत हा घरात वेगवेगळ्या मुलींना स्त्रियांना आणून त्यांच्याशी शारीरीक संबंध ठेवत असे. फिर्यादी यांनी जाब विचारल्यावर मला तू इथे नसल्यावर शारीरीक सुखाशिवाय राहणे अशक्य आहे, म्हणून मी माझ्या मैत्रिणी घरी आणतो, असे सांगितले होते. ८ मे २०२६ रोजी दुपारी त्या घरी असताना सासरे घाडगे आले. तेव्हा त्यांनी भांडणे सुरु केली. मी तुझा सीडीआर काढला आहे. तू वारंवार तुझ्या आईशी रोज बोलते, तुला आम्ही सारखे दम देऊन सांगितले होते. त्यावेळी तिच्या भावाला बोलावून घेऊन त्यांच्या भावाबहिणीच्या नात्यावर संशय व्यक्त केला. विक्रांत व त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या अत्याचार व छळामुळे तसेच जिवीतास धोका निर्माण झाल्यामुळे त्या भावाबरोबर माहेरी आल्या. कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमालस तपास करीत आहेत.

You may have missed