Devendra Fadnavis | पुण्यातील विषारी दारू प्रकरणात 8 जणांना अटक; ‘ही हत्या असून कठोर कलमे लावली’ – मुख्यमंत्री फडणवीस
Devendra Fadnavis | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 8 संशयितांना अटक केली असून आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता तपासात समोर येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “माझे पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. या प्रकरणात अत्यंत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. ही केवळ दुर्घटना नसून एक प्रकारची हत्या आहे. मद्यामध्ये मिथेनॉलसारखा घातक पदार्थ मिसळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.”
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
