Pune Crime Nasrapur Case | नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात आरोप निश्चित; 82 साक्षीदारांसह भक्कम पुरावे न्यायालयात सादर

Pune Crime Court News | Pune: Bail application of Chandrakant Ramchandra Sanglikar, the prime accused in the ₹28 crore land scam, rejected again.

पुणे : Pune Crime Nasrapur Case | नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात पुण्याच्या विशेष न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. न्यायालयाने आरोपपत्रातील पुरावे प्रथमदर्शनी भक्कम असल्याचे नमूद करत या खटल्याची दररोज ‘इन-कॅमेरा’ सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.

सरकार पक्षातर्फे न्यायालयात आरोपी मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचा वैद्यकीय अहवाल, डीएनए आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा तसेच एकूण ८२ साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली. आरोपी आणि पीडित मुलगी एकत्र दिसल्याचे सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांचे जबाबही पुराव्यांचा भाग असल्याचे सांगण्यात आले.

विशेष सरकारी वकिलांनी आरोपीविरोधात अपहरण, बलात्कार, खून, विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर आरोप सिद्ध करणारी परिस्थितीजन्य व कागदोपत्री पुराव्यांची साखळी असल्याचा दावा केला. बचाव पक्षाने पुराव्यांवर आक्षेप घेतला असला तरी न्यायालयाने आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्याइतका पुरावा उपलब्ध असल्याचे नमूद केले.

यानंतर आरोपीला आरोप वाचून दाखवण्यात आले. आरोपीने आरोप फेटाळून लावले असून न्यायालयाने या प्रकरणाच्या नियमित सुनावणीस सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत.

You may have missed