Dr Ambedkar Jayanti | रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंबेडकर जयंतीनिमित्त अल्पोपहार व रोप वाटप
पुणे : Dr Ambedkar Jayanti | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अल्पोपहार वितरण तसेच रोप वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन येथे झालेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार बापूसाहेब पठारे, सभागृह नेते गणेश बिडकर, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश उपाध्यक्ष हुलगेश चलवादी, सरचिटणीस महिपाल वाघमारे, सरचिटणीस श्याम सदाफुले, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेवक नीलेश अल्हाट, जयदेव रधवे, निलेश रोकडे, चिंतामण जगताप, सनाबी शेख, हर्षदा गायकवाड, मंगल रासगे, शोभा झेंढे, हनुमंत गायकवाड, मिलिंद चलवादी, अजय थोरात, सुनिल जाधव, बुद्धिशा रंधवे, शशिकांत मोरे, शांतीनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात नागरिकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले तसेच पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून रोपांचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा समाजाने अवलंब करावा, असे आवाहन यावेळी केले.
