Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करुन डोक्यात दगड, विटा घालून निर्घुण खुन; येरवडा येथील कॉमर्स झोन जवळील घटना

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करुन त्याला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी न उडल्याने टोळक्याने कोयत्याने वार करुन तसेच दगड, विटा डोक्यात घालून तरुणाचा निर्घुण खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

गौरव गणश तेलंगी (वय १८, रा. सिंहगड रोड, नवले हॉस्पिटलजवळ) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना येरवडा येथील कॉमर्स झोन परिसरात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुंसार, गौरव गणेश तेलंगी हा पूर्वी शिवाजीनगर परिसरात रहायला होता. त्यावेळी तेथील मुलांबरोबर त्याचे वाद झाले होते. त्यानंतर तेलंगी हा  सिंहगड रोड परिसरात रहायला गेला होता. गौरव तेलंगी हा मंगळवारी रात्री कॉमर्स झोन परिसरात आल्याची माहिती मिळाल्यावर तौफिक शेख व त्याच्या साथीदारांनी गौरव याला गाठले. आज याचा निकाल लावू, असे म्हणून शेख याने आपल्याकडील पिस्तुलातून गोळीबार केला. परंतु, पिस्तुलातून गोळी उडाली नाही, हे पाहून गौरव पळून जाऊ लागला. तेव्हा टोळक्याने त्याला पकडून कोयत्याने वार केले. दगड,विटा त्याच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात गौरव तेथेच पडल्याचे पाहून हल्लेखोर पळून गेले. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गौरव तेलंगी याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला. विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You may have missed