Gold-Silver Price Today | आजचा 10 ग्रॅमचा सोन्या-चांदीचा भाव काय? जाणून घ्या

Gold

मुंबई : Gold-Silver Price Today | आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ आता जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतालाही बसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने सोने आणि चांदीवरील आयातशुल्कात थेट ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ केली असून, हे नवे दर आजपासूनच लागू करण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज, १६ मे २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५८,८१० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,४५,५७६ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. तर १ किलो चांदीचा भाव २,७१,२३० आहे.

दरम्यान, देशातील वाढत्या आर्थिक आव्हानांचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. “पुढील वर्षभर नागरिकांनी सोने खरेदी करणे टाळावे, तसेच पेट्रोल आणि डिझेलचा वापरही कमालीचा कमी करावा,” असे पंतप्रधान म्हणाले. आखाती संकटामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा आणि परकीय चलन साठ्यावर होणारा परिणाम रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी गळ त्यांनी घातली आहे. सरकारच्या या कठोर पावलांमुळे आगामी काळात सोने आणि इंधनाचा तुटवडा रोखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

You may have missed