Pune Crime News | सॉफ्टवेअर इंजिनियरच्या क्रिप्टो करन्सी वॉलेटवर रुमानियातून सायबर हल्ला करुन दहा लाखांचे क्रिप्टो करन्सी लंपास

Pune Crime News | Software engineer's cryptocurrency wallet hacked from Romania, cryptocurrency worth one million stolen

पुणे : Pune Crime News |  सॉफ्टवेअर इंजिनियरच्या कंपनीच्या आभासी चलन व्यवहारातील (क्रिप्टो करन्सी वॉलेट) खात्यावर सायबर हल्ला करुन त्यातील ८ वॉलेटमधून ९ लाख ८४ हजार ४६९ रुपयांचे चलन लंपास केले आहे.

याप्रकरणी बालेवाडी येथील एका ५० वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २१ एप्रिल ते ७ मे २०२६ दरम्यान घडली आहे. रुमानियामधून हा सायबर हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची स्वत:ची क्रिस्टल एम्पायर येथे सॉफ्टवेअर कंपनी आहे. तसेच ते स्वत: क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंग करतात. ते हम्ब या ऑनलाईन प्लॅटफॉम वर ट्रेडिंग करतात. त्यांचे क्रिप्टोचे मल्टीपल वॉलेट असून ते वेगवेगळ्या कंपनीचे एकूण ८ वॉलेट आहेत. ७ मे २०२६ रोजी नेहमीप्रमाणे ते सर्व क्रिप्टोचे वॉलेट चेक करत होते. त्यांच्या वॉलेटमध्ये शिल्लक कमी दाखविली जात होते. त्यांनी एका ओळखीच्या क्रिप्टो एक्सपर्ट यांना त्यांचे युएसडीटी कोठे ट्रान्सफर झाले याची माहिती काढण्यास सांगितली. त्यांनी माहिती काढून त्यांचे युएसडीटी Binance Hot Wallet6, KuCoin Hot Wallet2, RedotPay Hot Wallet  या वेगवेगळ्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर झाले आहेत.  त्यांच्यावरुन त्यांच्या लक्षात आले की, सायबर चोरट्यांनी त्याच्या परवानगीशिवाय सायबर हल्ला करुन त्यांच्या वॉलेटचे ब्लॉक चेन अ‍ॅड्रेस आणि प्रायव्हेट की चा वापर करुन वॉलेट मधील एकूण १०३६३ युएसडीटी ९लाख ८४ हजार ४६९ रुपयांचे क्रिप्टो करन्सी फसवणूक करुन चोरुन नेली आहे. पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.

You may have missed