IMD Heavy Rainfall Warning | पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अनेक राज्यांना अलर्ट

IMD Heavy Rainfall Warning | Heavy rain warning for the next three days; IMD alerts many states

IMD Heavy Rainfall Warning | देशभरात माॅन्सूनपूर्व पावसाचा जोर वाढताना दिसत असून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. अनेक भागांत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवसांसाठी विविध राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. २०२५ मध्ये समाधानकारक पावसानंतर २०२६ मध्येही पावसाचे चित्र सकारात्मक राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एल निनोचा प्रभाव संभवत असला तरी पावसावर त्याचा मोठा परिणाम होणार नाही, असा अंदाज आहे.

केरळमध्ये माॅन्सूनपूर्व पावसाची तीव्रता वाढली असून पुढील तीन दिवसांत जोरदार सरींचा अंदाज आहे. यासोबतच ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

तामिळनाडूमध्येही पुढील काही दिवसांत मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ईशान्येकडील राज्ये तसेच मध्य भारतातील अनेक भागांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होणार असून उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

You may have missed