Maharashtra IPS Officer Transfer | संजय दराडे पुण्याचे नवे पोलीस सह आयुक्त; खरात प्रकरणातील एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते बढतीवर पुण्यात गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी

Maharashtra IPS Officer Transfer | Sanjay Darade new Joint Commissioner of Police Pune; SIT chief in Kharat case Tejashwi Satpute promoted to Additional Commissioner of Police, Crime Branch, Pune

पुणे : गृह विभागाने राज्यातील अनेक  अतिवरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोकण परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची गुन्हे अन्वेषण विभागात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक १ च्या समादेशक आणि अशोक खरात विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर पोलीस दलात अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पदी बढतीवर नियुक्ती करण्यात आली आहे.  पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची सीआयडीमध्ये पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांचीही बदली करण्यात आली आहे.

प्रमुख पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या पुढील प्रमाणे

पोलीस अधिकारी, (सध्याचे पद) बदलीचे ठिकाण

पोलीस उपायुक्त संभाजी कदम (पुणे शहर), पोलीस अधीक्षक, सीआयडी
पी आर पाटील (पोलीस अधीक्षक, सीआयडी), पोलीस उपायुक्त पुणे शहर
गौहर हसन (पोलीस उपायुक्त, मुख्यालय, सोलापूर), पोलीस उपायुक्त, पुणे शहर
संजय सरगौडा पाटील (पोलीस उपायुक्त, नवी मुंबई) पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड
धीरज पाटील (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तासगांव, सांगली), पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड
हिम्मत जाधव (पोलीस उपायुक्त, पुणे शहर), पोलीस उपायुक्त बृहनमुंबई
रोहिदास पवार (अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे) पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड
डॉ. शिवाजी पवार (पोलीस उपायुक्त, पिंपरी चिंचवड) पोलीस उपायुक्त, बृहनमुंबई
विक्रम देशमुख (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, पुणे), पोलीस उपायुक्त मिरा भाईदर, वसई विहार
विशाल गायकवाड (पोलीस उपायुक्त, पिंपरी) अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे शहर
शफकत आमना (अपर पोलीस  अधीक्षक, धाराशिव), पोलीस अधीक्षक, सीआयडी, पुणे
शुभम कुमार (सहायक पोलीस अधीक्षक, अचलपूर, अमरावती), अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

You may have missed