PSI Ajit Bade-Sudam Tayde Arrested | पुणे : खंडणी प्रकरणात बडतर्फ PSI अजित बडे, पोलीस अंमलदार सुदाम तायडे अटकेत; रील स्टार आणि महिला पोलिस सोनाली हिंगे अद्याप फरार

PSI Ajit Bade-Sudam Tayde Arrested | Pune: PSI Ajit Bade dismissed in extortion case, Police Officer Sudam Tayde arrested; Reel star and female police officer Sonali Hinge still absconding

पुणे : PSI Ajit Bade-Sudam Tayde Arrested |  नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून तब्बल सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक अजित त्र्यंबक बडे (Ajit Trimbak Bade) आणि अंमलदार सुदाम बाळकृष्ण तायडे (Sudam Balakrishna Tayde) यांना शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने दोघांना १९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील बडतर्फ महिला पोलिस अंमलदार आणि रील स्टार म्हणून चर्चेत असलेली सोनाली हिंगे (Sonali Hinge) अद्याप फरार असून तिचा शोध सुरू आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील दामिनी पथकात कार्यरत असताना सोनाली हिंगे (Reel Star Sonali Hinge) हिची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. आरोपींनी तिला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे.

त्यानंतर संबंधित मुलीवर तक्रारदारांविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यासाठी दबाव आणण्यात आला. तसेच, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवण्यात आली. वैयक्तिक आणि संस्थेची बदनामी करण्याचा कट रचून तक्रारदारांकडून सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

You may have missed