Maharashtra Traffic Police | वाहनचालकांशी सौजन्याने वागा आणि वसुलीसाठी सक्ती नको; अपर पोलीस महासंचालकांचे ट्रॅफिक पोलिसांना कडक निर्देश
मुंबई : Maharashtra Traffic Police | राज्यातील रस्ते वाहतूक पोलिसांच्या वर्तणुकीबाबत आणि दंड वसुलीच्या पद्धतीबाबत अनेक तक्रारी समोर येत असतानाच, वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक (ADG) यांनी संपूर्ण राज्यभरातील ट्रॅफिक पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यापुढे रस्त्यावर वाहनचालकांना अडवल्यानंतर त्यांच्याशी अत्यंत सौजन्याने आणि आदराने वागण्याचे आदेश देण्यात आले असून, दंड वसुलीसाठी कोणतीही अनावश्यक सक्ती करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अप्पर पोलीस महासंचालकांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, वाहतूक पोलिसांचे मुख्य काम हे रस्ते सुरक्षा राखणे आणि वाहतूक सुरळीत करणे हे आहे, केवळ दंड वसुली करणे नव्हे. अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांशी अरेरावी केली जाते किंवा वसुलीसाठी दबाव टाकला जातो, ज्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी आता प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना संयम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या नव्या निर्देशांनुसार, जर एखाद्या वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केले असेल, तर त्याला कायद्यानुसार दंड आकारला जावा, मात्र हे करत असताना त्याच्याशी वाद घालणे किंवा अपमानास्पद वागणूक देणे टाळावे. तसेच, प्रलंबित दंड वसुलीच्या मोहिमेदरम्यान वाहनचालकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी ५ मार्च रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत बैठक बोलावली होती. या बैठकीत वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी वाहतूक पोलिसांच्या कामकाजाबाबत गंभीर तक्रारी मांडल्या होत्या.सरकारने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घरगुती गॅसच्या साठेबाजीला आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता गॅस कंपन्यांनी व्यावसायिक वापरापेक्षा घरगुती वापराला प्राधान्य द्यावे, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच, एका सिलिंडरनंतर दुसऱ्या सिलिंडरच्या बुकिंगचा कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवस करण्यात आला आहे, जेणेकरून साठेबाजी रोखता येईल. मात्र, काँग्रेसने सरकारच्या या नियोजनावर तीव्र टीका करत ‘सरकार केवळ कागदी घोडे नाचवत असून प्रत्यक्ष जमिनीवर जनतेला सिलिंडर मिळत नाहीये’ असा आरोप केला आहे. या टंचाईमुळे आगामी काळात गॅसचा काळाबाजार वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली असून, सरकारने तातडीने शुद्धीकरण कारखान्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देऊन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
