National Fire Service Week | राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह 2026 निमित्त MNGL कडून चाकण नगरपरिषद अग्निशमन दलाच्या समन्वयाने लेव्हल-2 मॉक ड्रिल आयोजित
पुणे : National Fire Service Week | महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) यांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह 2026 निमित्त चाकण नगरपरिषद अग्निशमन दलाच्या समन्वयाने यशस्वीपणे लेव्हल-2 आपत्कालीन मॉक ड्रिल आयोजित केली.
या मॉक ड्रिलमध्ये कंप्रेसर एरिया मध्ये गॅस गळती होऊन आग लागल्याचा काल्पनिक प्रसंग उभारण्यात आला होता. या सरावाचा उद्देश आपत्कालीन तयारी, प्रतिसादाची गती, विविध पथकांमधील समन्वय आणि सुरक्षा नियमांचे पालन यांचे मूल्यमापन करणे हा होता.
या मॉक ड्रिलवेळी MNGL चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये उपाध्यक्ष (O&M) श्री. माणिक कदम, सीजीएम – फायर अँड सेफ्टी श्री. सागर वर्मा आणि जीएम – एचआर श्री. सचिन काळे यांचा समावेश होता. तसेच स्टेशन फायर ऑफिसर श्री. प्रकाश वाघ आणि त्यांच्या अग्निशमन पथकाने उत्कृष्ट समन्वय साधत ड्रिल यशस्वीपणे पार पाडली.
MNGL कडून या उपक्रमात श्री. राकेश दहारे, श्री. शुभम तिवारी, श्री. प्रथमेेश पांगारे, श्री. कृष्णा तळमळे, श्री. शशांक पांडे, श्री. आयुष कुमार, श्री. जितेंद्र पाटील, श्री. गजानन पाटील आणि श्री. अमोल गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या मॉक ड्रिलमधून MNGL ची उच्च सुरक्षा मानके राखण्याची आणि स्थानिक प्रशासनासोबत प्रभावी समन्वय साधत आपत्कालीन प्रतिसाद क्षमता अधिक सक्षम करण्याची बांधिलकी अधोरेखित झाली.
