Pune Crime News | 60 लाख रुपये देऊन फ्लॅटचा ताबा घेतला असताना महिला एकटी रहात असल्याचा गैरफायदा घेऊन बिल्डर निलेश कामठे याने परस्पर दुसऱ्याला फ्लॅट विक्री करुन दोन बँकाकडून घेतले कर्ज

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | ६० लाख रुपये देऊन फ्लॅटचा ताबा घेऊन रहात असताना बिल्डर प्रभाकर कामठे याने महिला एकटीच रहात असल्याचा गैरफायदा घेऊन तोच फ्लॅट दुसर्‍याला विक्री करुन दोन बँकांची कर्जे घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या बँकांनी कर्ज थकवल्याने जप्तीची नोटीस फ्लॅटवर चिटकवली आहे.

याबाबत एका ४५ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी निलेश प्रभाकर कामठे Nilesh Prabhakar Kamthe (वय ४२, रा. कामठे निवास, पुण्यधाम आश्रम रोड, कोंढवा), दीपमाला काळे आणि चंद्रकांत संगणाळे (वय ५५, रा. कुल उत्सव, खडी मशीन, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील निर्माण इस्ट्रेला येथे मे २०१५ ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती कुवेत येथे नोकरीला असून त्या पुण्यात दोन मुलासह राहतात. कोंढव्यातील  सोमजी चौक जवळ निर्माण इस्ट्रेला या नावाने बांधकाम सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी बिल्डर निलेश कामठे यांची भेट घेतली. त्यांना फ्लॅट आवडल्याने त्यांनी ८३२ स्क्वेअर फुटाचा फ्लॅट विकत घेण्याचे ठरविले. २०२५ पासून २०२३ पर्यंत त्यांनी वेळोवेळी ६० लाख रुपये कामठे यांना दिल्यानंतर जून २०२३ रोजी कामठे याने त्यांना फ्लॅटची चावी दिली. रेराचा नंबर लॅप्स झाल्याने मी खरेदी खत करु शकत नाही, असे त्यांना खोटे सांगितले. फ़्लॅटचे इंटिरीअर व फर्निचरचे काम करुन त्या फ्लॅटमध्ये रहायला गेल्या. तेव्हापासून फ्लॅटचा ताबा त्यांच्याकडे आहे. सोसायटीचा मेंटेनन्स व लाईटबिल त्याच भरत आहेत.

त्या रहायला गेल्यानंतर काहीच दिवसांनी १८ जून २०२५ रोजी आय सी आय सीआय बँकचे कर्मचारी घरी आले. त्यांनी हा फ्लॅट बँकेकडे तारण ठेवला असून हप्ते थकलेले आहेत. त्यांनी फ्लॅट खाली करण्याची नोटीस दिली. या घटनेची चौकशी केल्यावर बिल्डर निलेश कामठे याने आर्थिक अडचणीमुळे फ्लॅटची विक्री केली आहे. संगणाळे हा माझाच माणूस आहे. २ महिन्यात बँकचे कर्ज नील करतो, असे आश्वासन दिले. चंद्रकांत संगणाळे यांनीही तसेच सांगितले. त्यानंतर १५ दिवसांनी धरमपेठ बँक, नागपूर येथील कर्मचारी घरी आले. त्यांनी या फ्लॅटवर होम लोन निलेश कामठे व दीपमाला काळे यांनी थकविले आहे. हा फ्लॅट ८ दिवसात तुम्ही रिकामा केला नाही, तर आम्ही तुमचे सामान घराबाहेर काढून फ्लॅटचा ताबा घेऊ  असे सांगून फ्लॅट जप्तीची नोटीस दारावर लावून निघून गेले. त्यानंतर निलेश कामठे याने २ महिन्यात बँकाचे कर्जाची संपूर्ण रक्कम भरुन तुम्हाला खरेदीखत करुन देतो, असे लेखी आश्वासन दिले. तरीही कर्जफेड केली नाही.

महिलेचे पती कामानिमित्त परदेशात असल्याने  महिला एकटी असल्याचे पाहून निलेश कामठे याने गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. पोलीस निरीक्षक नवनाथ जगतपास तपास करीत आहेत.

You may have missed