Petrol Diesel price Hike | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; कोणत्या जिल्ह्यात किती दर? जाणून घ्या
मुंबई : Petrol Diesel price Hike | अवघ्या चार दिवसांतच दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात ९१ पैशांची, तर डिझेलच्या दरात ९४ पैशांची वाढ झाली आहे. परिणामी, मुंबईत पेट्रोलचा दर वाढून १०७.४९ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे, तर डिझेलचा दर ९४.०२ रुपयांच्या टप्प्यावर जाऊन पोहोचला आहे.
महिन्याच्या १५ तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती; आता अवघ्या चार दिवसांतच पुन्हा एकदा दरवाढ झाल्यामुळे, जनतेमध्ये संताप उसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी, १५ मे रोजी पेट्रोलच्या दरात ३ रुपये आणि डिझेलच्या दरात ३.११ रुपयांची मोठी वाढ लागू करण्यात आली होती. त्या दरवाढीला जेमतेम चार दिवसच उलटले होते, तोच पेट्रोल आणि डिझेलचे दर दुसऱ्यांदा वाढवण्यात आले. हे नवीन दर मंगळवारी सकाळी लागू झाले.
इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) किमती गगनाला भिडल्या आहेत. परिणामी, भारतीय तेल कंपन्यांना मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना करावा लागत होता. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर, केंद्र सरकारने या आर्थिक बोज्याचा काही भाग सर्वसामान्य जनतेवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे; आणि हाच निर्णय आता पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांच्या रूपाने समोर येत आहे.
महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर –
मुंबई –
पेट्रोल – १०७.४९
डिझेल – ९४.०२
पुणे –
पेट्रोल – १०७.८६
डिझेल – ९४.४०
नागपूर –
पेट्रोल – १०८.०६
डिझेल – ९४.६३
कोल्हापूर –
पेट्रोल – १०८.३७
डिझेल – ९४.९३
सोलापूर –
पेट्रोल – १०८.२१
डिझेल – ९४.७५
नाशिक –
पेट्रोल – १०८.८४
डिझेल – ९५.३५
