PMIS News | प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) 2026 – तिसरा टप्पा जाहीर; तरुणांसाठी मोठी संधी

PMIS News | Pradhan Mantri Internship Scheme (PMIS) 2026 - Third Phase Announced; A Major Opportunity for YouthPMIS News | Pradhan Mantri Internship Scheme (PMIS) 2026 - Third Phase Announced; A Major Opportunity for Youth

पुणे : PMIS News |  केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून देशभरात ३१,४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

या योजनेंतर्गत उमेदवारांची पात्रता वय १८ ते २५ वर्षे, भारतीय नागरिकत्व आवश्यक, किमान १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्णवेळ नोकरी किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार अपात्र असतील.  जे उमेदवार ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेत आहे ते उमेदवार पात्र आहेत. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिने असून दरमहा रु. ९,०००/- विद्यावेतन दिले जाणार आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.

PMIS या योजनेमध्ये पुणे जिल्हयामधील ज्युबिलंट फडवर्क्स लि. (192), बोश लि. (300),   रिलायन्स इंडिस्ट्रीज लि. (33), टेक महिंद्रा (30), स्कोडा ऑटो व्होल्क्सवॅगन इंडिया प्रा. लि.  (19), इमामी लि. (15), फिनोलेक्स केबल्स ‍लि.  (15), कॉग्नीझंट टेक्न्कॉलॉजी सोल्युशन्स इं. प्रा. लि. (14), आयबीएम इंडिया  प्रा. लि. (10), महिंद्रा ॲण्ड महिंद्रा (254) ई. नामांकित कंपनीमध्ये रिक्तपदांसाठी उमेदवारांना इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध आहे. तरी या कंपनीमध्ये अ‍ॅप्लाय करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्यामुळे pminternship.mca.gov.in या पोर्टलवर जाऊन नादणी करुन रिक्तपदाना अर्ज करावा व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ पुणे या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र. ०२०-२६,१३३६०६, वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

You may have missed