Pramod Balwadkar Join BJP | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद बालवडकर यांचा भाजप प्रवेश

Pramod Balwadkar Joins BJP | NCP's Pramod Balwadkar joins BJP

पुणे – Pramod Balwadkar Join BJP | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. पाषाण भागातून पाटील यांचे विरोधक नगरसेवक अमोल बालवडकर यांना शहा देण्यासाठी निम्हण यांचा भाजप प्रवेश महत्वाचा ठरणार आहे.

भाजपच्या शहर कार्यालयात शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी निम्हण यांच्या सोबतच मनसेचे प्रल्हाद गवळी आणि शिवसेनेच्या वैष्णवी किराड यांचा देखील पक्ष प्रवेश झाला. गवळी हे एकेकाळी माजी आमदार आणि शिवसेनेचे शहर संघटक रवींद्र धांगेकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर वैष्णवी किराड यांनी देखील नुकतेच शिवसेनेकडून महापालिका निवडणूक लढविली होती. त्यामुळे निबंध आणि किराड यांचा भाजप प्रवेश करून चंद्रकांत पाटील यांनी एकाच वेळी दोन कडवे विरोधक रवींद्र धंगेकर आणि अमोल बालवडकर यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

You may have missed