Pune Crime News | महिला पोलीस अंमलदाराशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस हवालदाराला केले निलंबित
पुणे : Pune Crime News | महिला पोलीस अंमलदार यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या कारणावरुन पोलीस उपायुक्त पी आर पाटील यांनी पोलीस हवालदाराला निलंबित केले आहे.
किरण दत्तात्रय देशमुख (Kiran Dattatray Deshmukh) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. किरण देशमुख सध्या कोर्ट कंपनी येथे नेमणुकीस होता.
किरण देशमुख हा अगोदर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तेथे असताना त्याने महिला पोलीस अंमलदार यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचे अनुषंगाने तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्यामुळे त्याची बदली कोर्ट कंपनी येथे करण्यात आली होती. या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यात तथ्य असल्याचे आढळून आले. त्यावरुन बेशिस्त व नैतिक अंध:पतनाचे आणि शिस्तबद्ध असलेल्या पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे अशोभनीय वर्तन केल्याचे दिसून आल्याने पोलीस उपायुक्त पी आर पाटील यांनी किरण देशमुख याला निलंबित केले आहे.
