Pune ACB Trap Case | वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफारवर भावांची नोंद करण्यासाठी 1 लाखांची लाच घेतल्यानंतर आणखी 25 हजार रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्याला पकडले
पुणे : Pune ACB Trap Case | वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफारवर दोघा भावांच्या नावाची नोंद करण्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपये घेतले असताना आणखी २५ हजार रुपयांची लाच घेताना माण तलाठीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
संतोष प्रल्हाद राणे Santosh Pralhad Rane (वय ४५, रा. गंगा ओशियन पार्क, राजस सोसायटीजवळ, कात्रज – कोंढवा रोड) असे या तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांचे निधन झाले. त्याचे वडिलोपार्जित जमिनीच्या फेरफारवर तक्रारदार व त्यांच्या भावाचे नाव नोंद करण्यासाठी तलाठी राणे यांनी तक्रारदाराकडे सव्वा लाखांची मागणी केली. त्यातील १ लाख रुपये यापूर्वी स्वीकारले. फेरफारवर नोंद केली असून तक्रारदार यांच्याकडे उर्वरित २५ हजारांची लाच मागत होता. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. १४ मे रोजी केलेल्या पडताळणीत तलाठी संतोष राणे याने तक्रारदाराच्या या कामासाठी अगोदर १ लाख रुपये स्वीकारल्याचे मान्य करुन उर्वरित २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. १९ मे रोजी माण तलाठी कार्यालयात सापळा आयोजित करण्यात आला. त्यात तक्रारदाराकडून २५ हजार रुपये घेताना राणे याला पकडण्यात आले. हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर व त्यांचे सहकारी यांनी केली. सहायक पोलीस आयुक्त भारती गोरे तपास करीत आहेत.
