Pune Court News | नसरापूर बालिका अत्याचार व हत्या प्रकरणाची 21 मेपासून इन-कॅमेरा सुनावणी; पुण्यात विशेष न्यायालयात जलदगतीने खटला चालणार

Pune Crime Court News | Pune: Bail application of Chandrakant Ramchandra Sanglikar, the prime accused in the ₹28 crore land scam, rejected again.

पुणे : Pune Court News |  नसरापूर, ता. भोर येथील तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाची सुनावणी आता पुण्यातील विशेष न्यायालयात होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या खटल्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले असून, २१ मेपासून नियमित आणि जलदगतीने सुनावणी सुरू होणार आहे.

प्रकरणाचे गांभीर्य आणि पीडित बालिकेचे वय लक्षात घेता, ही सुनावणी इन-कॅमेरा पद्धतीने घेतली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात खटल्याची सुनावणी होणार आहे.

ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने या प्रकरणात वेगाने तपास पूर्ण केला. घटनेनंतर अवघ्या १४ दिवसांत ११०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, एफएसएल अहवाल, वैद्यकीय अहवाल आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हे दोषारोपपत्र सादर करण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी दिली.

तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला असून, तांत्रिक पद्धतीने पुरावे संकलित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. खटल्याच्या सुरुवातीलाच न्यायालयाने घटनास्थळाची पाहणी करावी, अशी विनंती ॲड. मिसर यांनी न्यायालयाकडे केली आहे.

या खटल्याची सुनावणी विक्रमी कालावधीत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, आरोपीला कठोर शिक्षा मिळवून पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी व्यक्त केला.

You may have missed