Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात अडकवुन लग्नास नकार दिल्याने 17 वर्षाच्या युवतीने गळफास घेऊन संपविले जीवन
पुणे : Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात अडकवुन नंतर लग्नास नकार देऊन फसविल्याने अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
सहकारनगर पोलिसांनी समीर महादेव रणदिवे Sameer Mahadev Ranadive (वय २२, रा. फोडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जुलै २०२५ ते २ जानेवारी २०२६ रोजी घडली होती. याबाबत मुलीच्या ३८ वर्षाच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १७ वर्षाची मुलगी कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती. समीर रणदिवे याने ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती त्याच्या जाळ्यात अडकल्याचे समजल्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवुन तिचा गैरफायदा घेतला. त्यानंतर त्याने तिला लग्नास नकार दिला. हे सहन न झाल्याने तिने २ जानेवारी २०२६ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
सहकारनगर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. तपासामध्ये समीर रणदिवे याने या मुलीची फसवणूक केल्याने तिने आपले जीवन संपविल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे तपास करीत आहेत.
