Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून 17 वर्षाच्या युवकाचा निर्घुण खुन; फुरसुंगीमधील घटनेत चौघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | 17-year-old youth brutally murdered due to past enmity; in the Fursungi incident, a case was filed against four minors

पुणे : Pune Crime News |  पूर्ववैमनस्यातून एका १७ वर्षाच्या युवकाचा निर्घुण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फुरसुंगी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

करण रवींद्र नागटिळक (वय १७, रा. भोसले व्हिलेज, दत्त मंदिराजवळ, भेकराईनगर, फुरसुंगी) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याची बहिण सोनाली रवींद्र नागटिळक (वय २२) हिने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना भेकराईनगर येथील सासवड रेल्वे स्टेशन ते संकेत विहारकडे जाणार्‍या रोडवर रेल्वे पटरीजवळ १७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण नागटिळक आणि आरोपी हे अल्पवयीन असून त्यांचे पूर्वी भांडणे झाली होती. करण याच्यावर यापूर्वी एका खुनाचा गुन्हा दाखल आहे. काळेपडळ येथील संशयितांनी या जुन्या कारणावरुन करण नागटिळक याला रेल्वे मार्गाच्या कडेला असलेल्या रोडवर गाठले. त्याच्या डोक्यात, चेहर्‍यावर, दोन्ही हातावर लोखंडी हत्याराने सपासप वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आल्यावर हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त पी आर पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपी हे काळेपडळ येथील राहणारे असल्याचे समजल्यावर पोलिसांनी चौघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

You may have missed