Pune Crime News | विनयभंग केल्याने मुलाने कोयत्याने वार करुन तरुणाचा केला निर्घुण खुन; दौंड पोलिसांनी दोघांना केली अटक
पुणे : Pune Crime News | ऑगस्टमधील विनयभंगाच्या प्रकरणावरुन मुलाने साथीदाराच्या मदतीने तरुणाला एकटे गाठून त्याच्यावर कोयत्याने वार करुन निघून खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अरुण अनिल पवार (वय ३१, रा. सोनवडी, ता. दौंड) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याबाबत सुनिल अनिल पवार (वय ३३, रा. सोनवडी, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी दिनेश विजय पवार Dinesh Vijay Pawar (वय २०) आणि रुपेश मिथुन राठोड Rupesh Mithun Rathod (२०, दोघे रा. सोनवडी ता. दौंड) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण पवार हा जेसीबी चालवत होता. तो व त्याच्या दोन भावांवर ऑगस्ट महिन्यात महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. दिनेश पवार हा सध्या १२ वीला शिकत असून रिक्षा चालवतो. त्याने रुपेश राठोड याला बरोबर घेऊन कॉर्डलाईन ते पवार पॅलेस रोडवर अरुण पवार याला १७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता एकटे गाठून पकडले. त्याच्या तोंडावर, डोक्यात कोयत्याने वार करुन त्याचा खुन केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. खुन करुन पळून गेलेल्या दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक ए एस बिद्री तपास करीत आहेत.
