Pune Pimpri Crime News | दुबईला सिमकार्ड पुरविणार्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; 10 ते 12 हजार सीमकार्ड पुरविणार्या मुंबईतील विक्रेत्यांना अटक
पुणे / पिंपरी : Pune Pimpri Crime News | निगडी प्राधिकरणातील सुमंत दसरे याला दुबईहून डिपोर्ट केल्यानंतर पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडील तपासात सिम कार्ड पुरविणारी आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आले आहे. त्याला १० ते १२ हजार सीमकार्ड पुरविणार्या चौघांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड येथील एका गुन्ह्यात तुषार अमरराम चौधरी Tushar Amarram Chaudhari (वय २९, रा. सानेवस्ती, चिखली, पुणे) आणि आदर्श संतोष वाघमारे Adarsh Santosh Waghmare (वय २७, रा. आकुर्डी, पुणे) यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. तपासात सुमंत ऊर्फ नानू रविंद्र दसरे Sumant alias Nanu Ravindra Dasre (वय २६, रा. निगडी प्राधिकरण, पुणे) हा मुख्य आरोपी दुबईतून सायबर फसवणुकीचे जाळे चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरोधात पाठपुरावा करून एलओसी आणि इंटरपोलच्या माध्यमातून माहिती मिळवण्यात आली. त्यानंतर मुंबई विमानतळावरून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सुमंत दसरे हा चिनी सायबर चोरट्यांच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी करीत होता. त्याच्याकडील तपासात त्याला सिमकार्ड पुरविणार्या टोळक्याची माहिती हाती लागली.
१० ते १२ हजार सिमकार्डचा पुरवठा
या टोळीला सायबर गुन्ह्यांसाठी लागणारी मोबाईल सिमकार्ड पुरवणार्या मनिष अशोलाल वाधवा Manish Asholal Wadhwa (वय ४४, रा. अंबरनाथ पूर्व, मुंबई) आणि महेश कन्हैयालाल चौथरामानी Mahesh Kanhaiyalal Chouthramani (वय ६०, रा. कल्याण पश्चिम, मुंबई) यांनाही तांत्रिक तपासाच्या आधारे अटक करण्यात आली. तसेच सूरज मुन्नालाल चिकवा Suraj Munnalal Chikva (वय ३२, रा. विक्रोळी, मुंबई, मूळ रा. चित्रकूट, उत्तर प्रदेश) आणि राजा अशोक कुमार Raja Ashok Kumar (वय ३१, रा. ठाणे पश्चिम, मुंबई, मूळ रा. वैशाली, बिहार) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हे आरोपी मुंबईत रस्त्यावर छत्री लावून सीमकार्ड विक्री करत असत. लोकांना सीमकार्ड विक्री केल्यानंतर ते अॅक्टिव्हेट केले जात नसे.
सिम कार्ड ग्राहकांच्या नावावर, पुरवठा सायबर चोरट्यांना
सिमकार्ड विक्रीच्या प्रक्रियेत ग्राहकांच्या नावावर सिम कार्ड घेऊन, ओटीपी एक्सपायर झाल्याचे किंवा सर्व्हरमध्ये अडचण असल्याचे खोटे कारण सांगून संबंधित ग्राहकांना सिमकार्ड न देता ती सिमकार्ड सायबर फसवणूक करणार्या साथीदारांना पुरवली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या सीमकार्डचा वापर बनावट ई-मेल आयडी तयार करणे, बनावट अॅप्लिकेशनची नोंदणी करणे, बँक खात्यांना लिंक करणे आणि ऑनलाइन फसवणुकीचे व्यवहार करण्यासाठी केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सिम कार्ड ची यादी पोलिसांना मिळाली आहे. त्यावरुन किती लोकांची फसवणूक झाली, याची अद्याप संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस, सागर पोमण, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार दीपक भोसले, नितेश बिचेवार, देवा वाघमारे, अतुल लोखंडे, सुरज शिंदे, किरण देवकर, विशाल निचित, स्वप्निल खणसे, श्रीकांत कबुले, माधव आरोटे, सोपान बोधवड, दत्तात्रय मसने, दिपाली चव्हाण, जयश्री पाटील, मानिका चित्तेवार, नम्रता कांबळे यांनी केली आहे.
