Pune Crime News | सोसायटीतील 10 टक्के मोकळी जागा परस्पर सोसायटीच्या नावे हस्तांतरीत करुन फसवणुक करणार्‍या साईचरण सोसायटीचे चेअरमन समीर शिंदे, खजीनदार निखिल राणे यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | सोसायटीचे पुन्हा पुर्नविकसनाचे काम करण्याची प्रक्रिया करताना मानीव अभिहस्तांतरण दस्त करताना मोकळी सोडलेली १० गुंठ्यांतील शेकडा १० टक्के जागा परस्पर सोसायटीच्या नावे करुन फसवणूक केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी साईचरण सोसायटीच्या चेअरमन, खजीनदारासह ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शैला रवींद्र कावरे (वय ६८, रा. साईचरण सोसायटी, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साईचरण सोसायटीचे (Saicharan Society Bibvewadi) चेअरमन समीर दशरथ शिंदे (Sameer Dashrath Shinde), खजीनदार निखिल प्रकाश राणे (Nikhil Prakash Rane), सुचक अभय काकासाहेब खानविलकर (Abhay Kakasaheb Khanwilkar), अनुमोदक बिपीन प्रकाश राणे (Bipin Prakash Rane) आणि गणेश भटेवरा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री बिल्डर्स तर्फे ढमाले कुटुंबियांनी बिबवेवाडी येथील मिळकत विकसन करुन इच्छुक खरेदीदारांना १९८७ -८८ मध्ये सदनिका विक्री केल्या. या सदनिका धारकांनी त्याला साईचरण सहकारी गृहरचना संस्था मर्यादित ही संस्था स्थापन केली. त्यात शांताराम पांडुरंग कावरे यांच्या नावे दोन वेगवेगळ्या सदनिका विकसन करारानुसार मालकी हक्काने दिल्या. विकसन करारनाम्यानुसार मिळकतीचे प्लॅनमधील मोकळी सोडलेली शेकडा १० टक्के (११६ चौमी) जागा ही शांताराम पांडुरंग कावरे व ढमाले यांच्या नावे राहणार होती. पुढे ढमाले यांनी २०११ मध्ये ही जागा कावरे यांना दिली.

फिर्यादी व त्यांची जाऊ यांच्या पतीचे निधन झाले असल्याचे माहिती असतानाही सोसायटीने १३ मार्च २०२४ रोजी मानीव हस्तांतरण अर्जामध्ये जमीन मालक म्हणून शांताराम कावरे, सुशिला कावरे तर्फे रवींद्र कावरे व सुधाकर कावरे (रा. सदाशिव पेठ) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे व जाणून बुजून चुकीचे पत्ते दिले. त्यामुळे फिर्यादी यांना कोणतीही नोटीस मिळाली नाही. त्यामुळे त्यांना त्यांचे म्हणणे मांडता आले नाही. 

त्यामुळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी एक पक्षीय मानीव अभिस्तांतरण प्रमाणपत्र जारी केले. त्यावरुन सोसायटीचे अध्यक्ष समीर शिंदे व इतरांना पूर्वीपासून माहिती असतानादेखील त्यांनी आपसात संगनमत करुन साईचरण सोसायटीचे कन्वीन्स डीड करुन त्यांच्या नावे असलेली संपूर्ण जागा परस्पर सोसायटीचे नावे करुन घेतली. त्यांची फसवणूक केली. तसेच कन्वेन्स डीडमध्ये शांताराम कावरे यांचे सदनिका ३ व ४ असे दोन वेगवेगळे फ्लॅट असताना दोन्ही फ्लॅट एकत्रित दर्शविले आहेत. पोलीस उपनिरीक्षक भुवड तपास करीत आहेत.

You may have missed