Pune Crime News | तुझ्या बापाचा रोड आहे?, म्हणत टोळक्याने तरुणाला केली मारहाण; दगड मारल्याने तरुणाचे नाक झाले फ्रॅक्चर

Pune Crime News | Showing blood on his hands, he said, "I just played a game"; Raj Pawar gang, who tried to murder a young man in a hotel, beat up employees and staged a protest at a petrol pump for not giving free petrol

पुणे : Pune Crime News | गप्पा मारत थांबलेले असताना तुझ्या बापाचा रोड आहे, असे म्हणून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मारहाण करुन जबर जखमी केले. दगड नाकावर मारल्याने या तरुणाचे नाक फ्रॅक्चर झाले आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रशांत लाटे (वय २९), अभिषेक माने (वय २३), विशाल पवार (वय २५), सोन्या ऊर्फ अविनाश बडे (वय २८, सर्व रा. विशाल मित्र मंडळाजवळ, वडारवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत चेतन सतिश बनपट्टे (वय २४, रा. विशाल मित्र मंडळाजवळ, वडारवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना वडारवाडीतील विशाल मित्र मंडळाजवळ रोडवर १३ मे रोजी रात्री साडेदहा वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र ओम गोपाळ जाधव (वय २८, रा. वडारवाडी) हे १३ मे रोजी रात्री साडेदहा वाजता रोडवर गप्पा मारत उभे होते. त्यावेळी प्रशांत लाटे आपल्या पत्नीसह तेथे आला. त्याने चेतन बनपट्टे याला म्हणाला की, येथे कशाला थांबला  तुमच्या  बापाचा रोड आहे का?, असे बोलून दोघांनी शिवीगाळ करुन चेतन याला मारहाण केली. ओम हा भांडणे सोडवु लागला. तेव्हा त्याला ते तू मध्ये पडु नको, असा दम दिला. प्रशांत याने त्याच्या गाडीच्या डिक्कीतून लोखंडी हत्यार काढून चेतन याच्या डोक्यात मारुन जखमी केले. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याने तो जमिनीवर पडला. ओम जाधव यालाही त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने तो तेथून पळून गेला. तेव्हा प्रशांत लाटे याने त्याचे मित्र अभिषेक माने, विशाल पवार, सोन्या बडे यांना बोलावून घेतले. त्यांनी चेतन याच्या अंगावर दगड फेकून मारले. त्यातील दगड नाकावर लागून चेतन याचे नाक फ्रॅक्चर झाले. अभिषेक माने याने काठीने तर सोन्या बडे याने बांबुने मारहाण केली. हे समजल्यावर चेतन याची आई, बहिण, काका हे धावुन आले. त्यांनी उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले होते. उपचार घेतल्यानंतर त्यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दादा पवार तपास करीत आहेत.

You may have missed