Pune Police News | वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी डॉ. संदीप भाजीभाकरे; परिमंडळ ३ च्या उपायुक्तपदी डॉ. सागर कवडे यांची नियुक्ती
पुणे : Pune Police News | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यानुसार विशेष शाखेतील पोलीस उपायुक्त डॉ. संदीप रामदास भाजीभाकरे यांची वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांची परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक केली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथून पुण्यात बदलून आलेले सहायक पोलीस अधीक्षक जीवन देवाशिष बेनिवाल यांची परिमंडळ ६ च्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १६ चे समादेशक प्रशांत श्रीराम अमृतकर यांची विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांची इंडियन सायबर क्राईम को ऑडिनेशन सेंटरच्या संचालकपदी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे.
